रारंग ढांग नंतर…

rarang-dhang-nantar-shrikrushna-savadi-prabhakar-pendharkar-chandrakant-chandrashekhar-barve-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-pustak-parichay-samiksha-rasagrahan

वास्तवाचे चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर, ‘रारंगढांग’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा (सीक्वल) लिहिण्याचं आव्हान ‘चंद्रकांत’ मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन् पेललं प्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी.

सवदी हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. पण त्यांनी प्रदिर्घ सेवा बजावली ती डिफेन्स अकांउट्स डिपार्टमेंटमध्ये, अत्यंत उच्च पदावर. वाड्मयीन व व्यावसायिक अनुभवातून मिळालेल्या बळाच्या जोरावर ते ‘रारंगढांग’चं आव्हान स्वीकारु अन् पेलू शकले.

पेंढारकरांपेक्षा सवदींची शैली वेगळी असली तरी ‘रारंगढांग’चं प्राणतत्व त्यांना सापडलं आहे. मूळ कथेचा पोतही या उत्तरकथेत बरोबर उतरला आहे. उत्तरकथेची कल्पना पेंढारकरांना आवडली होती. सवदी लिखित या उत्तरकथेला त्यांनी नक्कीच दाद दिली असती. आता कसोटी आहे ती वाचकांच्या रसिकतेची !

*

रारंगढांग नंतर
लेखक: श्रीकृष्ण सवदी
किंमत १८० /- ₹


वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :