गुंजन सक्सेना – एका स्त्री-योद्ध्याची गोष्ट!
नव्या शतकाची, नव्या विचारांची ओढ लागली असली तरी जुनं पूर्णतः सोडता येत नाही, अशा संक्रमणाच्या अवस्थेचा काळ होता. अशामधे, एक साध्या घरातली मुलगी येते आणि पाहता पाहता समाजानं मांडलेली सगळी समीकरणं मोडीत काढून एक नवं क्षेत्र पादाक्रान्त करते… ही घटना निश्चितच येत्या काळाला नवा आकार देऊ पाहणारी होती. या मुलीची, म्हणजेच गुंजनच्या संघर्षाची कहाणी सांगणारा चित्रपट – गुंजन सक्सेना!Read More →