आरं पोरा, तुला काय सांगू तुझा वनवास? आगदी लहान हुतास नि कसल्या तापाची साथ आली आणि चांगलं मोठालं डोळं होतं तुझं नि टकामका बघत हुतास सगळीकडं. त्या तापातच तुझं डोळं आलं नि जे खवलं ते लवकर उघडलच नाहीत. डॉक्टरकडं नेलं तर डॉक्टर म्हणाला, “पोराचं वाटोळ केलसा. आता हेचं डोळंच गेलंया.”Read More →

chitrakshare-dongralalele-diwas-shrikant-dange-harischandra-gad-kille-bhatakanti-pune-mumbai-trek

मराठ्यांचा सुवर्ण इतिहास व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हरिश्चंद्र पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वसलेला आहे. चांगदेव महाराजांचं वास्तव्य या गडाला लाभल्याचा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो.Read More →

chitrakshare-bhavana-durve-mansur-bhag-1-wesley-tingey-unsplash-goshta-creations-saarad-majkur-marathi-vyaktichitran

मन्सूरचं नाव जरी कानावर पडलं, तरी मन चाफ्याच्या फुलासारखं खुलून येतं. मन्सूर म्हणजे दिलखुलास, निस्वार्थी, देशप्रेमी, सर्वधर्म समभाव, माणूसकी जपणारा अवलिया. माणूस असा पण असतो, हे मन्सूरकडं पाहून कळतं.Read More →

chitraksahre-shreekant-dange-shahapurcha-mahuli_fort_from_pivali_end-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem-trekking-maharashtra-gad-kille-bhramanti

जाग आली तेव्हा सुर्यदेवाचं नुकतंच आगमन झालं होतं. समोरच धुक्याची शाल पांघरलेली सुळक्यांची रांग मन खिळवत होती. कदाचित ते सौंदर्य शब्दातही मांडता येणार नाही. ते सारं कॅमेरात कैद करण्यावाचून पर्याय नव्हता. अजून अर्धी चढण पार करायची होती. मनाला आवर घालत विश्रांती घेऊन नव्या दमानं पुन्हा चढाईला सुरवात केली.Read More →

chitrakshare-marathi-katha-parameshwar-mali-chimani-ghara-goshta-creations-saarad-majkur-henry-unsplash

वाड्याचा एक कोपरा ढासळलेला. मध्यभागी दोन तुळशी वृंदावनं. वाड्यात चिमण्यांचा वावर होता. मी ढाळजातल्या बोळीत चप्पल सोडली आणि चिमणीची घरं शोधत आत आलो…Read More →

kalasubai-milet-ranabhaji-adivasi-mahotsav-stalls-trek-shreekant-dange-dongaralalele-diwas-chitrakshare-gad-kille-bhatakanti-sahyadri-maharashtra-tourism-trek

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील शहरी-ग्रामीण विभागातून जमलेल्या माणसांच्या रात्री ओळखी-पाळखी झाल्या. शेकोटी, गप्पा आणि गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच कळसुबाई ट्रेकला सुरवात केली. राजेश पाटील नावाचा मित्र ‘अन्न गुड्गुडे, नार गुड्गुडे… ढिशक्याव ढिशक्याव’ अशा घोषणा देत सगळ्यांचा उत्साह वाढवत होता. Read More →

internet-image-rajmachi-trek-dongaralalele-diwas-shreekant-dange-chitrakshare-sahyadri-trek-gad-kille-bhatakanti

धावणाऱ्या लोकलप्रमाणं मनही धावत होतं. कितीतरी वेगानं. जाणाऱ्या प्रत्येक स्थानकानुसार विचार बदलत होते. लोकलमधल्या मित्रमंडळींशी गप्पा मारताना कर्जत स्टेशन कधी आलं कळलंच नाही. कर्जत स्टेशन बाहेर सगळ्यांनी जमायचं ठरलं होतं. सारेजण आल्याची खात्री होताच कपालेश्वर मंदिराच्या दिशेनं चालू लागलो. मंदिराजवळ पोहचताच ठरल्याप्रमाणं ६० जण ग्रुपमध्ये विभागून टमटमनं ‘कोंडीवडे’ गावाच्या दिशेने रवाना झालो.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-7-ram-lakshman-bhet-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

एसटी यायच्या बराच आधी तो जाऊन पोहोचला होता. स्टँडवर असणारी चार-दोन दुकानं नुकतीच उघडू लागली होती. दुकानावरची कामगार पोरं खराटा घेऊन दुकानासमोरची जागा झाडून घेण्यात व्यस्त होती. दूर कुठंतरी पाऊस झाला होता. त्याचा ओला ओला सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता. दुकानासमोरच्या जागेत सडा टाकल्यानं तो सुवास अजूनच ताजा झाला होता. पूर्वेला असणाऱ्या दूरवरच्या टेकडीवर असणारं देऊळ मागून येणाऱ्या सूर्यकिरणांनी दैवी प्रकाशत होतं.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-6-lakshman-bhetichi-aas-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

सोत्ताच्या पैशातलं चारानं-आठानं तरी दाखवती का आपल्याला? आपन काय काईच करत नाई का? बरं तुला बोलती, मला बोलती, दादालाबी बोलती. आपन काय सावत्र हाये का? तसं पाह्यलं तं म्हातारी येका हाताची बी नाई माझ्या. पाहीन तवर पाहीन आन् एखादं दिवशी इकडचं थोबाड तिकडं करून टाकीन.”Read More →

तुमच्या हापिसातला तो गोरागोमटा मुसलमान. कालच्याला बाजारपेठेत फिरत होता. एका मुलीशी लाळघोटेपणा करत होता. आता ही मुलगी कोण तर वकीलसाहेबांची. तिनं बघितलं बघितलं आणि त्याला चांगला कानफटवला. त्याला पळता भुई थोडी झाली.Read More →