बायजा १५: दु:खाचं व्यसन
वेगळ्याच हुरहुरीनं तिनं तिची लुगडी गाठोड्यात भरून ठेवली. बाहूलीसारख्या दिसणाऱ्या सकवार सुनेसाठी डाळी-साळी भरून ठेवल्या. राहिलेले काही दिवस कधी जातील असं तिला वाटू लागलं. तिच्या मनपटलावर शहरातल्या न पाहिलेल्या मोठमोठ्या रस्त्यांची, बगिचांची, लक्ष्मणाच्या चित्रासारख्या संसाराची चलतचित्रं तरळू लागत. आयुष्यानं पहिल्यांदाच इतके विसाव्याचे क्षण तिच्या ओंजळीत टाकले होते.Read More →