chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-5-jalata-ingal-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

सतत ‘यडं पोर, यडं पोर’ म्हणून तिनं हिणवत आलेल्या बाळूला जणू काही निसर्गच न्याय देत होता. म्हातारी डोक्यानं हल्लक होत चालली होती. आजुबाजुची लोकं तिला ‘यडी म्हातारी’ म्हणून संबोधू लागली होती. तिची जीभ जहरी होत चालली होती. राम तिचं जहर ऐकूनही गप्पच रहात होता. पण हे कुठपर्यंत?Read More →

marathi-kadambari-bayja-4-pangal-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजाचा नवरा दारू, बिडी, तंबाखू या व्यसनांमुळं थकल्यासारखा वाटायचा. तब्येतही खंगल्यासारखी झाली होती. बिडीचा झुरका घेतल्याबरोबर त्याला ढास लागे पण बिडी ओढल्याशिवाय त्याला जमत नव्हतं. कामही फार होत नसायचं. जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या छातीतून येणारा घरघर आवाज स्पष्टपणे ऐकायला येई. सवतीला कामाची सवय नव्हती. धसाकसाची कामं करण्याशिवाय बायजाच्या नवऱ्याला आणि सासूला पर्याय नव्हता.Read More →

marathi-kadambari-bayja-3-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

वावटळ आली की, खोपटाच्या झावळ्या आकाशात झेप घेऊ बघत. ती मेढी हातानं थांबून धरे. विजा लवू लागल्या की, घाबरणाऱ्या लेकरांना एखाद्या पक्षिणीसारखी पंखांखाली घेई. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नसे. कुडामेढीचं तिचं खोपट अंगावर पडतंय की काय अशी तिला भीती वाटे. कधी कधी बाळूच्या तोंडून विचित्र, मोठमोठ्यानं आवाज निघत. ती धावत बघायला जाई तर त्याच्या उशाशेजारी काळ्या पाठीच्या विंचवाचं बिऱ्हाड आलेलं असे.Read More →

marathi-kadambari-bayja-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजानं पोराचं नाव ‘बाळू’ ठेवलं होतं. आयूष्यभर तो बाळच राहणार होता आणि तिच्या आईपणाची सत्वपरीक्षा पाहणार होता, हे तिनं नकळतपणे अधोरेखित करून टाकलं. बाळूच्या बरोबरीची पोरं पावलं टाकू लागली पण बाळू नुसताच निपचित आढ्याकडं बघत बसलेला असायचा. तोंडातून लाळ गळत असायची. त्यावर माशा भणभणायच्या. पण बायजा कामातून मोकळी झाल्याशिवाय त्या कुणी वारतही नव्हतं.Read More →

bayja-marathi-kadambari-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-dr-kshama-shelar-govardhane-feministic-strivadstriwadi

दुःखाची मूळाक्षरं आधीपासूनच गिरवत असल्यासारखी समजूतदार बायजा पडेल ते काम करत धाडकन अंगावर पडलेला संसार नावाचा उपद्व्याप पैसाभर कुंकवाच्या आणि निळ्या-जांभळ्या व्रणांच्या बदल्यात निमूट करत होती. कधीतरी जलम आला आणि शरीरात काही तरी नवीन रूजलंही. त्या गोष्टीचा ना तिला आनंद होता, ना दुःख. नुसतंच भांबावलेपण…Read More →