bhakti-barve-inamdar-birthday-vadhadivas-punyasmaran-chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-chitrapat-vishayak-lekh-goshta-creations-saarad-majkur-asipofpoem

आज भक्ती बर्वेचे पुण्यस्मरण. सांगलीला जन्मलेली गोरटेली, बुटकी भक्ती. तिच्या साधेपणातही निराळेच सौंदर्य होते. आकाशवाणीच्या ‘विविध भारती’मध्ये काम करून ती दूरदर्शनमध्ये निवेदिका म्हणून रुजू झाली. प्रायोगिक नाटकातही तिची ख्याती होती. रेडिओ, रंगमंच, टेलिव्हिजन, सिनेमा सर्वच गाजवले या फुलराणीने.

पुलंच्या ‘ती फुलराणीने’ तिला वेगळीच प्रसिद्धी लाभली. त्या भूमिकेसाठी तिने मूळ ‘पिग्मँलिअन’ची पारायणे केली. ‘माय फेअर लेडी’चाही अभ्यास केला. अत्यंत अभ्यासू आणि प्रतिभावंत अशी भक्ती. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची ती अध्यक्ष होती, इतके तिचे मराठी थिएटरला योगदान होते.

बहिणाबाईच्या चित्रपटासाठी ती खास अहिरणी भाषा शिकली. त्या भाषेचा लहेजा, ढंग स्वीकारला. अतिशय अप्रतिम कार्यक्रम. ‘छान छान गोष्टी’ या बालकांसाठी असलेल्या गोष्टींसाठी असलेल्या कॅसेटमध्ये बऱ्याच कथांची निवेदने तिने केली.

कुंदन शहाचा ‘जाने भी दो यारो’ आणि गोविंद निहलानींचा ‘हजार चौरासीकी माँ’ हे चित्रपट तर क्लासिक्स. त्यातला भक्तीचा सहज पण जीव झोकून दिलेला वावर वाखाणण्याजोगा आहे.

‘ये जो है जिंदगी’ फेम शफी इनामदारशी तिने लग्न केले. पण शफीचेही हृदयविकाराने निधन झाल्याने ती अधिक एकाकी झाली. फार कमी काळ झाला त्यांचा संसार. बालकवींनी लिहिल्याप्रमाणे ‘विरहार्ता ती फुलराणी’ होती.

‘आई रिटायर होतेय’, ‘पुरुष’, ‘रंग माझा वेगळा’ सारखी वेगळ्या विषयांवरची नाटके असोत किंवा ‘वयं मोठम खोटम’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘चिनी बदाम’ सारखी बालनाट्ये असोत, तिने तिच्या भूमिका लीलया साकारल्या.

वयाच्या ५२ व्या वर्षी तिचा एका अपघातात मृत्यू झाला. आणि सारेच ‘आधे अधुरे’ राहिले…

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
आज दिनांक
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
कथा
कविता


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :