तुला तिलाही खुश करायचंय, मलाही आनंद द्यायचाय
मी इतकी स्वार्थी आहे की मलाही बदल्यात तोच घ्यायचाय..
स्त्री-पुरुष म्हंटलं की नात्यांच्या चौकटी शोधतात लोक
त्यात आपलं नातं सीमित नाही, जे आहे ते रोखठोक..
तुझं ज्ञान, तुझं वागणं, तुझे कातील आर्त डोळे
नाही म्हंटलं तरी तुझं ध्यान, वाटते साधेभोळे..
तुझं ज्ञान सोडलं तर मी कशालाच बधणार नाही
संधी मिळाली तरीही स्वार्थ माझा साधणार नाही..
माझे षड्रिपु झटकायचे नाहीत मला, त्यांचीही एक मजा आहे
तुला वगळले तर मात्र ती एक मोठीच सजा आहे..
तू तिलाही खुश ठेव, तू मलाही आनंदी ठेव
मीही तेच करेन असं नाही, त्याची मात्र तयारी ठेव..
*
वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
पेंटिंग
कविता
चित्रकथा
कथा
'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..