(‘सनफ्लॉवर्स’ या ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’च्या प्रसिद्ध चित्रावर लिहिलेली कविता)
पिवळ्या भिंतीशी
पिवळ्या फुलदाणीत
फुले जर्द पिवळी
दिनकर आकाशी
प्रखर रौद्र तो
फुलरूपामध्ये निवळी
किरणे होती पाकळ्या
मधला रजगोल सूर्यच जणू
जरी देठ ताठला फुलाफुलांचा
नत होती पाहता प्रकाश अणू
या सूर्यफुलांना पाहून होते
एका गोष्टीचे स्मरण
एका पाठीने एक चालणे
जन्माच्या मागूनी मरण…
*
वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
पेंटिंग
कविता
चित्रकथा
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..