गर्ल बिफोर मिरर (पाब्लो पिकासो)

Girl-before-mirror-Pablo-Picassos-work-rama-jadhav-kolhapur-kavi-kavayitri-dmcs-dcs-savitribai-phule-university-marathi-kvita-painting-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

(‘गर्ल बिफोर मिरर’ या ‘पाब्लो पिकासो’च्या प्रसिद्ध चित्रावर लिहिलेली कविता)

दर्पणात पाहणारी ती..

ती पाहते आहे…

चेहरा रंगवून दिवसा, आयुष्याचा जलसा भोगी
रात्र मग उतरवते नक्षा, दिसते कुणी बेरंगी रोगी
ही मीच का विचारण्या डोकावते आहे
ती पाहते आहे…

या इकडे जीव पोटीचा आनंदे ती मिरवत आहे
तिकडे पण स्तन ओघळते, नजरेला नाकारत आहे
रती इकडली, एका मातेला आसावते आहे
ती पाहते आहे…

आरसा पाहून तिला ती, नको वाटते वदते ती
प्रतिबिंबाहून कुरूप या, नसेल कोणी हसते ती
पुन्हा पुन्हा उठून स्वतःला न्याहाळते आहे
ती पाहते आहे…

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
पेंटिंग
कविता
चित्रकथा

कथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :