स्टारी नाईट

starry_night_full-vincent-van-gough-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-rama-jadhav-vacha-kavita-online-pratilipi-marathi

(‘स्टारी नाईट’ या ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’च्या प्रसिद्ध चित्रावर लिहिलेली कविता)

ही लखलखणारी रात
ही चमचमणारी रात
या निजल्या नगरावरती
ही उजळे चांदण रात

घरे अंधारी झोपली
एखादे अजून जागे
गर्द निळ्या नभाच्या लाटा
पेलणारी चांदण रात

हा प्रकाश उसना आहे
बोलतो हसूनी चंद्र
मज ठाऊक आहे म्हणूनी
हसणारी चांदण रात

मन चंचल अतीव माझे
ना स्थिर, ना मोहा त्यागी
एकेका ताऱ्या भूलुनी
विझणारी चांदण रात

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
कविता
चित्रकथा

कथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    व्वा, मस्तच!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :