इफ यू फर्गेट मी (पाब्लो नेरुदा)

(‘पाब्लो नेरुदा’ यांच्या ‘इफ यू फर्गेट मी’ या प्रसिद्ध कवितेचा स्वैर अनुवाद)

लक्षात ठेव
तुला माहीत आहे?
जेव्हा मी लाल फांदीशी आलेला शरदातला चकचकीत चंद्र
माझ्या खिडकीतून पाहते,
जेव्हा अगम्य राखेला
किंवा लाकडावरच्या रेषांना स्पर्श करते,
सगळं काही मला तुझ्याकडेच खेचून आणतं,
जणू काही मी
सुगंध, प्रकाश, धातूंनी बनलेली बोट असावी
जी वाट पाहणाऱ्या बेटाकडे
वाहत येते.

पण आता जर
हळूहळू तुझं माझ्यावरचं प्रेम कमी कमी होत गेलं,
माझं प्रेमही आटत जाईल.

जर
तू मला विसरलास,
मी तुला आधीच विसरलेली असेन.

जर
तू वेड्यासारखा
माझ्या आयुष्यातल्या वादळांचा विचार केलास
आणि मला
हृदयाच्या किनाऱ्याशी,
जिथं माझी मुळं आहेत तिथं मला सोडून जायचं ठरवलंस
तर लक्षात ठेव

त्या दिवशी,
तत्क्षणी
माझी मुळं इतर जागेच्या शोधात निघतील
पण तेव्हाच
तुला तीव्रतेनं वाटेल
मीच गूढ गोडीनं तुझ्या नशिबात लिहिले गेले आहे

जर तेव्हा रोज ओठांवर हसूचं एक फूल घेऊन
तू माझ्या शोधात निघालास
तर माझ्या सख्या,
मी राखेतून पुन्हा आग होऊन जन्मेन,
माझं प्रेम तुझ्या प्रेमाबरोबर वाढेल
आणि तुझ्याच कवेत असेल
जोपर्यंत तू असशील
माझी सोबत न सोडता.

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
पेंटिंग
कविता
चित्रकथा

कथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :