डोळ्यांत पाणी असणाऱ्यांना
जरा लवकर,
ओठांवर खोटं हसू
अन् चेहऱ्यावर आव असणाऱ्यांना
जरा उशीरा…
पण तो भेटतोच
पहिल्यांदा,
सगळं जाणून घ्यायचं असत तेव्हा
थिअरी म्हणून
तत्त्वज्ञान म्हणून
पुस्तकात, पॅम्पलेटमधला फोटो म्हणून
दुसऱ्यांदा,
विनाकारणच्या तिरस्कारात
निषेधात
टीकेत
त्याला काडीची अक्कल नव्हती म्हणत
आपण
त्याचीच भाषा बोलू लागतो तेव्हा
अन् तिसऱ्यांदा…
जेव्हा आपण,
मदांध सत्तेच्या शोषणाविरुद्ध
रस्त्यावर उभं राहतो…
पाय रोवून
डोळे वटारून
तेव्हा
सोबत डाव्या बाजूला
तो भक्कमपणे उभा असतो
आयुष्यभराचा सखा होऊन…
*
वाचा
कविता
सुदेश इंगळे यांच्या कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
‘बायजा‘ – कादंबरी
कथा
मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.