भवानी..

mahalaxmi-kirnostav-day-third-kolhapur-lakshmi-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-sudesh-ingale-marathi-kavita-bhavani-pratilipi-chhatrapati-shivaji-maharaj

सदा भवानी उभी राहा तू
घट्ट शिळांच्या माथ्यावरती
चंद्रसावळ्या बुबुळात अन्
धगधगणाऱ्या जिव्हांवरती…

सदा भवानी उभी राहा तू
मेंढा कापत हंकाराचा
शीर जाळत्या कुंडाभवती
कुंकवाचा सडा शिंपल्या
पसाऱ्यागत अंगणावरती…

सदा भवानी फिरत राहा तू
मळकटलेल्या रस्त्यांवरती
अन् नजरेतून अत्तर शिंपड
उदासलेल्या चेहऱ्यावरती

कधी भवानी रुसून बस तू
गाभाऱ्यातच… खोबणीवरती
येता जाता किरकिरणाऱ्या
प्रागैतिहासिक भिकाऱ्यांवरती

सदा भवानी अशीच हस तू
मंडपात तिरप्या प्रतिबिंबातून
रांगेमधल्या कणाकणावर
चरवीमधल्या ब्रह्मांडावर…

अन् भवानी कोप सदा तू
कोप होऊ दे अपरंपार
मस्तक नसल्या मांसाचा
सडलेला पृथ्वीवर भार
आता,
कोप होऊ दे अपरंपार

(परवा यादी ठेवलीय पायाजवळ)

*

वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :