एक नाजुक ठिपका…

sudesh-ingale-marathi-kavita-themb-shunya-zero-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-soneri-shinganche-kalavit

हा व्यापाराचा किस्सा
माझा नाही
या फायदया-तोट्यात हिस्सा
माझा नाही

इथल्या शर्यतीला जोड
माझी नाही
इथल्या सोंगाची खोड
माझी नाही

हा सौंदर्याचा पुळका
माझा नाही
हा संस्कृतीचा खिळगा
माझा नाही

ही शाणपणाची वर्णनं
माझी नाहीत
या थिअऱ्या-पुराणं
माझी नाहीत

एक नाजुक ठिपका…

एक नाजुक ठिपका…
असंबध्द गडबडीचा
शरीराच्या गाभाऱ्यात
दिव्यागत वळवळीचा…
… तोच काय तो माझा

*

वाचा
कविता

सुदेश इंगळे यांच्या कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :