हे झाड कैसे कुठले कळेना
पिकण्याआधी का गळतात पाने
ऋतुंनी तुला या किती बोलवावे
खुणांनी दुज्या का चळतात पाने
हिरवेपणाची नशा कैफ चढता
वार्याविना ही हलतात पाने
किती लावला जीव याच्यावरी मी
दिशांना हव्या त्या वळतात पाने
उन्हाच्या झळा लागल्या ना परीही
स्वतःच्याच वणव्यात जळतात पाने
*
वाचा
इतर कविता
कथा
‘महाडचे दिवस’ (कादंबरी)
दीपाली दातार या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 'शारदीय मोरपिसे' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
दीपालीची कविता नेहमीच आशयसंपन्न असते. ही कविताही तशीच आहे. आपल्या मनात जिवंत होऊन राहाणारी.
आहाहाहा, क्या बात है!! अतिशय सुंदर कविता!!
खूप खूप छान.. अखेर.. अगदी वास्तव.. स्वत:च्यांच वणव्यांत जळतात पाने..