हात तू हातात माझे घेतले अन्
संगतीने चालण्याचे भान आले
वाद मी इतुका तुझ्याशी घातला पण
बोलताना ऐकण्याचे भान आले
तू मला द्यावे तसे रे मी तुलाही
काय द्यावे काय घ्यावे भान आले
वाट गर्दीची कितीही चालले मी
शांत वाटेने रुजावे भान आले
ठेवले जागेवरी पण हरवते ना?
नेमके शोधावयाचे भान आले
धावणे हा धर्म मोठा हे खरे पण
थांबण्याचे मज शहाणे भान आले
*
वाचा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ (कादंबरी)
कथा
दीपाली दातार या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 'शारदीय मोरपिसे' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
मस्तच!💐
व्वा! क्या बात है !! थांबण्याचे मज ‘ शहाणे ‘ भान आले ! फारच सुंदर कुठे थांबायचे हे कळणे फार महत्त्वाचे! पूर्ण कवितेत एक समंजसता ,जाणीव, जगण्याचे शहाणे भान नेमक्या शब्दात आले. कुठेही किंचितही प्रबोधन करायला न जाता , नेमका परिणाम कवयित्रीने साधला आहे!! फारच सुंदर