महाडचे दिवस ४: ऑफिस नावाचं प्रकरण
2020-09-07
वयस्कर दुकानदारांना म्हटलं, ‘‘साधी छत्री द्या. साधी यासाठी द्या की कुठं विसरली तर फार वाईट वाटायला नको.”
ते म्हणाले, ‘‘कोकणात नवीन दिसताय. तुम्ही चप्पल विसरता का?”
मी म्हटलं, ‘‘ती कशी विसरेन, बाहेर पाऊल टाकताना थोडीच चप्पलची आठवण ठेवावी लागते.”
आलेलं एक गिऱ्हाईक म्हणाले, ‘‘अहो, महाडात छत्री कधीच विसरली जात नाही. कारण पाऊस कधीच थांबत नाही.’’Read More →