तुझा पत्ता विसरण्याची
गरज आहे हरवण्याची
कुठे आले अजुन स्टेशन
किती घाई उतरण्याची
उतारावर सख्याचे घर
मला भीती घसरण्याची
नवी ही खोड आजीची
जुन्या पेट्या उघडण्याची
तुला कुठले नको बंधन
तिची इच्छा अडकण्याची
घड्याळाला दिली शिक्षा
पुढे काटे ढकलण्याची
चुलीला काळजी नसते
कधी पोळी करपण्याची
*
वाचा
निर्मिती कोलते यांच्या कविता
कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
निर्मिती कोलते या उत्तम कवयित्री आणि अनुवादक आहेत.
व्वा क्या बात है!! फारच सुंदर!!