या उन्हावर मात केली पाहिजे
सावली आयात केली पाहिजे
पाहुणा आहे घरी अंधार जर
मंद थोडी वात केली पाहिजे
दोन ओळींचा नको संवाद हा
पानभर सुरुवात केली पाहिजे
चूक आहे वाटते दुनियेस जी
चूक ती अर्थात केली पाहिजे
मावळू दे सूर्य मग भेटू म्हणे
या उन्हाशी बात केली पाहिजे
देव नसल्याची खुली चर्चा इथे
देवळाच्या आत केली पाहिजे
ठेवली अर्धी तुझ्यावरची गजल
पूर्ण या जन्मात केली पाहिजे
*
वाचा
निर्मिती कोलते यांच्या कविता
कविता
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
निर्मिती कोलते या उत्तम कवयित्री आणि अनुवादक आहेत.
खूप आभारी आहे.
पाहुणा आहे घरी अंधार जर , मंद थोडी वात केली पाहिजे!! वेगळ्याच जाणिवेची कविता वाचायला मिळाली. धन्यवाद ! 🙏 आवडली !