इवला इवला पाऊस

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-content-writing-firm-pune-sharad-kawathekar-marathi-kavita-paus-gani

इवला इवला पाऊस
तळहातावर गोळा केला
इवला इवला पाऊस
मातीवर नक्षीकाम करून गेला

इवला इवला पाऊस
खिशातल्या चौकटीतलं चित्र
ओलं करून गेला

इवला इवला पाऊस
आठवांच्या सरी
गालावर कोरून गेला

पण…
माहित नाही आताशा तो पाऊसच नाही
कुण्या दिशेला वाहून गेलेत ते ढग?
त्या ढगाबरोबरच
माझा इवला इवाला पाऊसही गेला
तो माझ्या डोळ्यांतली निळाई घेऊन गेला
तळहातात साठललेले पावसाचे पाणी घेऊन गेला
मातीवरची नक्षीदार मेंदी घेऊन गेला
आता काहीच राहिलं नाही
ना इवला पाऊस
ना ती डोळ्यांतली निळाई

*

वाचा
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव


+ posts

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    व्वा खूपच सुंदर कविता!!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :