‘एकदा कॉफी प्यायला जाऊया’ म्हणालास
मी क्षणभर गप्प…
वाटलं, काय असेल याच्या मनात?
फ्लर्ट तर करत नाहिये ना?
खरं तर भेटण्या बोलण्यासाठी
कॉफी वगैरेची काय गरज?
नुसतंही बोलता, व्यक्त होता येतंच की…
‘येशील ना?’.. तो
मी विचारांतून भानावर आले… ‘हो’ म्हणाले
यावर उजळलेला त्याचा चेहरा आणि डोळ्यातले भाव लोभसपणे पहात,
टिपत रहावेत असं वाटलं
पण ते क्षणभरंच…
वास्तवतेच्या जाणिवेने लगेच भानावर आले.
तर्कवितर्क, योग्य- अयोग्य, समाजमान्यता… डोक्यात विचारांचं थैमान…
पुढे म्हणालास..
‘एखाद्या शांत ठिकाणी जाऊ’
‘थंडी असेल.. ‘
‘छान उबदार शॉल ठेव अंगावर’
‘नुसता सहवास अनुभवू…’
‘तू कॉफीच्या वाफेत विरून जा
अन् मी… तुझ्यात…’
किती तरल.. उदात्त बोलतोस..
मी मात्र उगाच साशंक.. सावध..
*
वाचा
व्यंकटेश कुलकर्णी यांचं साहित्य
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
व्यंकटेश कुलकर्णी हे कृषी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत ते मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. कवी, गझलकार, गीतकार, नाटककार, संगीतकार, ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. फोटोग्राफी या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली असून ते नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.