शांत आहे ना…

Venkatesh-Kulkarni-Chitrakshare-Marathi-Kavita-Gazal-Shant-Ahe-Na

तसा मी शांत आहे ना!
तुला माहीत आहे ना!

सुन्या वाटा पुढे जाती
धरोनी सावली हाती
मनाची गोठली काया
किती एकांत आहे ना!

उरी काहूर एकांती
ढवळली अंतरी शांती
अशी आंदोलने येता
स्थिराया वेळ द्यावा ना!

पुन्हा तो कोरडा टाहो
उदासी भेदुनी जाओ
अशी ही भाबडी आशा
तुझा विश्वास आहे ना?

नको ना संभ्रमी राहू
मनाच्या निग्रहा पाहू
नियंत्याची असे मर्जी..
जरा समजून घेऊ ना!

कुणाला काय मागावे
कुणाला काय मी द्यावे
कुठे धागे.. कुठे दोरे
पुन्हा हा प्रश्न आहे ना!

*

वाचा
व्यंकटेश कुलकर्णी यांचं साहित्य
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

व्यंकटेश कुलकर्णी हे कृषी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत ते मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. कवी, गझलकार, गीतकार, नाटककार, संगीतकार, ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. फोटोग्राफी या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली असून ते नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.

4 Comments

  1. Avatar

    अप्रतिम. शेवट फारच सुंदर.

    1. Avatar

      अमित, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  2. अनुया कुलकर्णी

    किती एकांत आहे!! फारच सुंदर कविता!!

    1. Avatar

      अनुया जी, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :