नयनात दाटला भाव तुझा सारंगा
मी विसरुन गेले आज मला श्रीरंगा
नयनात दाटला भाव तुझा सारंगा
मी विसरुन गेले आज मला श्रीरंगा
हृदयातुन उठती स्वैर वादळे माझ्या
लाजून शहारुन चूर होतसे काया
स्पर्शास ओढ त्या तुझ्या नितळ कांतीची
वेढती भास आभास आज अंगांगा
मी विसरुन गेले आज मला श्रीरंगा
हळुवार बटांची खट्याळ कुजबुज गाली
लाजेत पापण्या हळूच झुकती खाली
पायात वाजते पैंजण छुमछुम कानी
झोंबतो गारवा स्पर्श मुलायम अंगा
मी विसरुन गेले आज मला श्रीरंगा
बघ श्वास जाहले स्वैर भासती उष्ण
का स्थिरावण्याचा व्यर्थ करू मी यत्न?
मी फिरून झाले पुलकित माझ्या सखया
चल रंगुन जाऊ प्रेमाच्या नव रंगा
मी विसरुन गेले आज मला श्रीरंगा
*
वाचा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
व्यंकटेश कुलकर्णी हे कृषी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत ते मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. कवी, गझलकार, गीतकार, नाटककार, संगीतकार, ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. फोटोग्राफी या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली असून ते नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.