चौकातल्या लाल सिग्नलपाशी मी उभी
तो म्हणाला, चल आता है क्या?
माझ्या पोटात भूकेचा डोंब नि त्याच्या कमरेखाली वासनांचा जाळ
कुबट खोलीत शिरते मी त्याला सोबत घेऊन
जुन्या-पुराण्या चिंध्यांच्या निर्जीव भावनाशून्य गाठोड्यासारखी…
तो लगबगीने पसरतो माझ्यावर… भोंगळ, आडवा-तिडवा
अक्राळविक्राळ, अधाशासारखा…
विखरून टाकतो चिंध्या
देहाचं गाठोडं विस्कटून…
अस्ताव्यस्त…
त्यातल्याच एका मळकट जुन्या चिंधीवर त्याच्या
वासनांचा किळसवाणा डाग…
पचकलेल्या पानासारखा…!
अंबाडा बांधत उठते मी सामसूम झाल्यावर
गाठोडं नीट बांधते पुन्हा एकेक चिंधी गोळा करून
आणि उभी राहते त्याच लालभडक सिग्नलपाशी
वाट बघत आणखी एका गाठोडं विस्कटणाऱ्याची…
*
वाचा
कविता
भालचंद्र सुपेकर यांच्या कविता
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
चित्रकथा
सुन्न करणारी कविता! भेदक शब्द चित्र
खूप खूप धन्यवाद
खूप अस्वस्थ करून गेली ही कविता
धन्यवाद
अंगावर घेणारी कविता आणि अंगावर येणारी संवेदनशीलता
दीपकराव, मनापासून धन्यवाद. तुमचे प्रोत्साहन कायमच आहे…
👌
आभारी आहे
आपण काही सत्य नाकारायचा प्रयत्न करतो. ही कविता अशी सामोरी येते की वास्तव नाकारताच येत नाही. ह्या विस्कटलेल्या आयुष्याने अजून अस्वस्थ केलं आहे आहे. ती परत सिग्नलवर उभी…. का?