रस्ता

kavita-datir-filmmaker-babai-giraki-gostha-creations-marathi-kavitachya-kavita-chitrakshare

मी समजून घेण्याचा प्रयत्न करते
घडतंय काय नक्की ते
तेव्हा वाटतं
थकवा आहे शरीरभर
शीण आहे
कसला?
एखादं ऑपरेशन झाल्यानंतर
गळालेलो असतो आपण तसा
ठणकत राहतात टाके
असह्य असतात वेदना
तसा

मी मग बोलते स्वतःशी
थकलेल्या मनाशी
सांगते त्याला
उठावं तर लागणार
किती काळ साचणार?
पडून राहणार शुद्ध हरपून?
चालावं तर लागणार

मग मी उठते
तोल सांभाळत उभी राहाण्याचा प्रयत्न करते
आणि टाकायला लागते
एक एक पाऊल
फाडलेल्या कातड्याचं जोडकाम झालंय
त्या टिपेचा रस्ता करून…

*

वाचा
इतर कविता
कथा

‘महाडचे दिवस’ (कादंबरी)


Film maker | + posts

कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.

4 Comments

  1. गीतांजलि अविनाश जोशी

    समर्पक. सध्या अनुभवते आहे मी ही स्थिती.

  2. अनुया कुलकर्णी

    खूपच सुंदर कविता ! खरोखर, आपल्या मनाची समजूत आपणच काढावी लागते … !

  3. अशोक थोरात

    वाह !a

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :