‘तो’
खिशात हात घालून
फेकतो तिच्यासमोर
कोरडे पडलेले
बुरशी लागलेले
स्वातंत्र्याचे तुकडे
उपकारागत
‘ती’
वर्षानुवर्षांची उपाशी
कोंबते ते तुकडे तोंडात
गटकन गिळते
आणि बघत बसते त्याच्याकडे
पुढच्या तुकड्याच्या प्रतिक्षेत
अधाशागत
*
वाचा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.