लागली चाहूल कसली
जीवाला पडला खेच
रेंगाळणाऱ्या पावलास
पडे उंबरठ्याचा पेच
कसे संपले इतक्यात
पाहुणचार या घराचे
तयार कशास पाहुणा
पंख ओढून पाखराचे
कसे तोडावे अलगद
झाडापासून त्याचे देठ
चालायाचे सोडून मागे
जगण्याची भरली पेठ
*
वाचा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.
व्वा क्या बात है! फारच सुंदर कविता!!