चुलीर च्यायचा आधान ठेवक गेलंय
चूल माझी वली वली, रातभर दुका गाळी
चूल माझी पेटता पेटाना,
धग तिका लागता लागाना
बाये झाला तरी काय तुझा
रुसान बसलंस तर खावचा तरी काय?
बाबा पुता केलंय, तेव्हा चुल माझी बोलती झाली
सावतीनीन गॅस हाडल्यान कल
कुदळीन फोडल्यानी माका,
मातयेची ढेकळा टाकल्यानी, मागील परड्यात
काळजात माझ्या धस्स झाला
रातभर डोळ्याक डोळो नाय लागलो
बाये तू दुखा तर गाळू नको
धसको तर तू घेवच नको
गॅस हाडलंय तरी माऊले
तुका नाय केव्हाच फोडूचंय
गॅसीर आसतली घायच्या येळार
केव्हातरी चलता बोलता चायपानी
पण अख्या घराचा जेवान
तुज्यारच गे मावले शिजताला
दळीदार बाधला तेव्हा तुझ्याच जीवार
कांजी कुवळ खावन दिस ढकलले
पोटात भुकेन आगीचो डोंब उसाळलो
तुज्यारच गे रटामेटा पॅज शिजयली
तानेन जीव तगमगलो, तुज्याच
वायलार फुटी चाय शिजयली
भुर्ग्याबाळाची दिस मावले
तुज्याच इंगळ्यार न्हिवयली
सकाळी उठान रेवो काढून
तुकाच गे मावले नटवतलंय
काजाळ कुकु लावन
तुकाच गे मावले सजवतलंय
सणासुदीची वाढी मावले,
तुकाच गे पयली दाखवतलंय
पुस ते डोळे, नी लाग कामाक
अपूरबायेची बाय ती माझी
दोन चुडते सारलंय चुलीत
चुल माझी रमरमान पेटली
वायला वयल्या दुधाक
भपकन फुगो इलो
*
वाचा
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
चित्रकथा
कल्पना,ही चूल बघायला सावंतवाडीला यावस वाटतं पण.. जिल्हा बंदी.
मस्तच कविता. ब-याच दिवसानंतर मालवणी भाषा वाचायला मिळाली. मजा आली.
रोहिदास कवळे
मस्तच आहे कल्पना ताई कविता!