मला कळेना कुठून
येते दुरांतून साद
माझ्या डोळ्यात कळस
टाळ-चिपळ्यांचा नाद!
अर्ध्या वाटेवर हाका
माझ्या तांड्यातून येती,
‘कुठे चालला पाखरा,
मेघ वर झाकोळती…’
तशी आणली ओढून
माझी मीच ही पालखी
मागे राखील कळप
साऱ्या युगांचा गुराखी!
तशी झाली उठाउठी
जाग बाहुलीला आली
तिने ओढियले धागे
पाठ भोयांची फिरली!
आलो माघारा फिरून
बाहुलीला निरोपाया
तिने अद्वैत साधले
मला आकाश साधाया!
माझ्या अंगात दडली
गोऱ्या बाहुलीची छाया
माझी उजळली कांती
कशी अद्वैत किमया!
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
Sunder
सुंदर… तरल…
किमया शब्दांची
किमया अनुयाची!
अद्वैत केवळ अप्रतिम