रहाटगाडे खडखड वाजे
खोल अडात शेष दडे
झोपमोड अन् करून त्याची
रितीच घागर वरती चढे
उखणलेल्या चुलीभोवती
भूकपिशाच्च धरण धरे
अंधारातून उंदिर पाली
मांजरी आणखी घूस फिरे
पारावरची शाळा उठली
पंचायतीतून ‘पक्षी’ उडे
चाऱ्यावाचुन म्लान जनावर
कामावाचून चूल नडे
… ज्या गावाचे नावही नव्हते
कोठुन आले येथ पसारे ?
वस्तीवरती नवीन गजबज
प्राणांवरती निळे दिवे !
ह्या झाडांवर नवी नव्हाळी ,
ह्या वेलींवर नवी फुले ,
कुणास ठाऊक कसे पुन्हा
अन् सृजनाचेही अंग उले !
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.