श्रावणधारा

anuya-kulkarni-marathi-kavita-pandharpur-sovali-nadichi-kaya-akshar-manav-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-kusumagraj

सरसर आल्या श्रावणधारा
झरझर वाहू लागे ओहोळ
निंबोणीच्या झाडावरचे
आठवणींचे उठले मोहळ

भिजू लागता अंगण सारे
खोप्या मधुनी दडती पक्षी
मोकळ्या कचभारा मधली
उतरू आली ओठी नक्षी

माडाखाली वस्त्र नेसली
ती वाऱ्यावर गेली राणी
बुंध्यावरुनी सरसर आले
नक्षत्रांचे निर्मळ पाणी

*

वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :