माळावरची हिरवळ
फुलांचा दरवळ
पिंपळाची सळसळ
वनांची पानगळ
मनांची हळहळ
अश्रुंचे ओघळ
पहाटेचे दळण
वळचणीला आठवण
गळ्याला दाटवण
आभाळी गारा
हुळहुळे वारा
पाळण्यात तारा
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.