दगडी शिळांनी
वाटा बंद करीतच
पुढे पुढे जात राहिले
पण, मनावर ठेवलेले
दगड, अवकाळीच पाझरले
तर ती वरुणकृपा
नक्कीच नसेल
उलट, भूमीलगतच्या
झऱ्यांना नख लागलं
इतकंच…
मात्र, पायाखालची वाट
या पुरात वाहून जाऊ नये
म्हणून मी,
झाडांवरची घरटी,
बघून ठेवलीयत
… आजकाल
दिवस मावळताना
मीही
पाखरांची वाट
पहात असते…
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.