झाली असशील तू म्हातारी मीही झालो आहे जर्जर…
अजून आहे उरात काही थोडी हुरहूर, थोडी थरथर…
साठीच्याही समोर गेलो बुद्धी तरीही शाबूत आहे
सैरावरा मन हे धावे इच्छा तरीही काबूत आहे
तुझ्यासारखीच निघून जाती आयुष्यातून वर्षे झरझर…
सुंदर होतीस नक्कीच तेव्हा मरणाऱ्यांची गर्दी होती
कधीच नव्हतीस पूर्ण कुणाची, तू साऱ्यांची अर्धी होती
दुखविलेस तू नाही कुणाला, हसून बोललीस केवळ वरवर…
अजून पडते स्वप्न तुझे अन सकाळ माझी सुंदर होते
षड्ज भेटतो, निषाद येतो आणि स्वरांचे झुंबर होते
भैरविला थांब म्हणुनी, भोगून घेतो मीही स्वर स्वर…
*
वाचा
अशोक थोरात यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नाही. फक्त अशोक थोरात.
व्वा, खूपच सुंदर कविता!!