नि:सत्व

chitrakshare-ashok-thorat-nisatva-marathi-kavita-dev-ahe-ki-nahi-1000

देव आहे, देव नाही
मला नाही त्याचे काही
माणसाने माणसाला
कधी जाणलेच नाही

त्याच्या नावे नित्य राडा
ह्याचे बांधा, त्याचे पाडा
त्याने सांगितले जे जे
कुणी मानलेच नाही

किती गरीब उपाशी
धोंडा घेऊन उशाशी
स्वप्न प्रत्यक्षात त्यांचे
कुणी आणलेच नाही…

पाया रचुनी अज्ञात
विटा वाहणारे हात
मंदिराला, मशिदीला
कधी भावलेच नाही…

आत, बाहेर दगड
जाती अठरापगड
देव धर्मामध्ये सत्व
कधी बाणलेच नाही…

*

वाचा
अशोक थोरात यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

3 Comments

  1. अनुया कुलकर्णी

    व्वा क्या बात है!! फारच सुंदर कविता! कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त झाला आहे..

  2. Avatar

    सुंदर कविता

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :