खोट्या खोट्या प्रलोभनांना विटलो मी
मृगजळाच्या लागून मागे फिटलो मी
आयुष्याचा ग्रंथ उघडला तुझ्या पुढे…
तू न चाळला, निमुटपणाने मिटलो मी
नदिसारखी वहात गेलीस पुढे पुढे तू
खडक फुटावा तसा उरातून फुटलो मी
‘नाही म्हणुनी’ एकदाच तू सांगून देना
मला स्वतःला मी समजाविन ‘सुटलो मी’
जुळणारच नाही आपुले नाते, जेव्हा कळले
जिथल्या तिथे सोडून सारे उठलो मी
*
वाचा
अशोक थोरात यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी