आला दिवायीचा सन माह्यं सजलं आंगन
दारी हासते रांगोयी करता सळा सारोयन
घरभर सुटला वास जवा दराबा फेटला
लाळू शेव चकल्या जवा चिवळा तयला
नयी साळी नेसीसन, घरची लक्षमी सजली
नया दागिन्यानं तिले नारायनानं सजोयली
लेकी सुनायच्या हासन्यानं माह्यं घर वं हासतं
अन आंब्याचं तोरन माह्या दाराले झुलतं
सजली चारचाकी दारी येइन ननंद माहेरा
भाऊ गेला वं मुऱ्हायी माय मारते चकरा
साळीचोळी माहेराची तिच करी माहेरपन
चार घास गोळधोळ ती सुखान खाइन
मीन हातात घेतलं आता ओवायनीचं ताट
उभी राहीसन दारात भावा पाह्यते मी वाट
सजवा माहेराची वाट मले माहेरी जायाचं
सुख माहेरपनाचं पदरी समायीसन घेयाचं
*
वाचा
माधुरी चौधरी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
चित्रकथा
माधुरी चौधरी यांचे 'मधुज मेलॉडी' व 'माह्या जगन्याची ताकद' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या 'माय मराठी साहित्य परीषदे'च्या संस्थापक व 'आम्ही लेखिका'च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. 'गुरूनाथ फाउंडेशन जळगाव'चा 'बहिणाबाई पुरस्कार', 'कवि मित्र संस्था, पुणे'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, 'हिरकणी संस्था, जालना'चा 'हिरकणी पुरस्कार', 'प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर'चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार', 'मातोश्री फाउंडेशन'तर्फे 'कर्तबगार महिला' सन्मान, 'विश्वशांति संस्थे'चा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष सन्मान, 'सेवक सेवाभावी संस्थे'चा 'हिरकणी' पुरस्कार, 'लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ, जालना'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.