चाल वं बहिन पारटी करू
भरीत, पुरी, कयन्याची भाकर
नरम नरम वांगे येने झाले सुरू
चाल वं बहिन पारटी करू
मस्तन् शेतातले वांगे काढू
काट्याकुट्या जमा करीसन भुजु
बांधावरल्या मिरच्या खुडू
तढिच इस्त्यावर त्याबी भुजु
चाल वं बहिन पारटी करू
जरूसं तेल जरा जास्तन् घेजो
भरतात टाक्याले शेंगदानेबी आनजो
खोबऱ्याचे तुकडे बी करी ठेवजो
कांद्याची पात तं शेतातुनच काढू
चाल वं बहिन पारटी करू
किच्या पानावर भरीत पुरी
त्याच्याबरोबर मस्तन् कढि
कांदा अन मुयाची चवच भारी
पायजे तं काहितरी गोड बी आनू
चाल वं बहिन पारटी करू
आपन सरव्या देरान्या, जेठान्या मीसन जावू
मानसायले येतांना डबे भरीसन घी येऊ
पायजे तं पोऱ्हायले बी तढी घी जावू
म्हताऱ्याकोताऱ्यायले इचारी घेऊ
चाल वं बहिन पारटी करू
*
वाचा
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
चित्रकथा
माधुरी चौधरी यांचे 'मधुज मेलॉडी' व 'माह्या जगन्याची ताकद' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या 'माय मराठी साहित्य परीषदे'च्या संस्थापक व 'आम्ही लेखिका'च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. 'गुरूनाथ फाउंडेशन जळगाव'चा 'बहिणाबाई पुरस्कार', 'कवि मित्र संस्था, पुणे'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, 'हिरकणी संस्था, जालना'चा 'हिरकणी पुरस्कार', 'प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर'चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार', 'मातोश्री फाउंडेशन'तर्फे 'कर्तबगार महिला' सन्मान, 'विश्वशांति संस्थे'चा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष सन्मान, 'सेवक सेवाभावी संस्थे'चा 'हिरकणी' पुरस्कार, 'लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ, जालना'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
व्वा!! फारच सुंदर पार्टीचा बेत आहे … खूपच सुंदर चविष्ट! आणि कविता ही तशीच सुंदर आहे!! बोलिभाषेचा गोडवा , आणि त्या ललनेच्या मनातले सर्वसमावेशक लाघव फारच सुंदर!!
धन्यवाद
आपण माझ्या कवितेला आपल्या व्यासपिठावर स्थान दिले त्याबद्दल धन्यवाद