‘आजचं पुस्तक’ मालिकेत आतापर्यंत फक्त फिक्शन पुस्तकांची ओळख करून दिली होती. आज पहिल्यांदाच आत्मचरित्राची ओळख देत आहे. फिक्शन वाटावी अशी ही वास्तव कहाणी आहे. स्वतःच्या जन्मदात्याने जमिनीत पुरून टाकलेली पोर आश्चर्यकारकरित्या बचावते. महिला म्हणून अन जातीवरून पदोपदी झालेले अपमान पचवून, संकटांवर मात करून कर्तृत्वाने मोठी उंची गाठते. समाजानं अनेकवेळा अन्याय केला तरी स्वतः समाजाच्या भल्यासाठी राबते. आज जागतिक महिला दिनानिमित्त, सुनिता अरळीकरांची ही कहाणी वाचायलाच हवी. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर अनाथपणाकडून सनाथपणाकडे झालेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे.
या पुस्तकाचे जगभरातल्या विविध भाषांत अनुवाद झालेत. उर्दूत ‘दास्तान-ए-हिरकणी’ हा अनुवाद मलिक अकबर यांनी केला. अमेरिकेत इंग्रजी अनुवाद पोचला. श्रीलंकेतील सिंहली, स्वीडनमधील स्वीडिश, कर्नाटकातले कन्नड वाचक त्यांच्या भाषांमध्ये हे पुस्तक वाचत आहेत.
लेखिका – सुनिता अरळीकर
प्रकाशन – अक्षर मानव प्रकाशन
किंमत – ₹ ३००