अंधुकश्या प्रकाशात
धुरकटलेल्या दिशांना शोधताना
शांततेच्या गर्भात
एक केशरी बिंब
भावनांना आकार देत असताना
साक्षीला होतं
विस्तीर्ण निळेभोर आकाश
ते निराकार आकाश
ते मोकळं ढाकळं आकाश
त्याच्या रिक्ततेच्या अनुभवाजवळ जाताना
स्वतःच अज्ञानांनी शून्य झालेलं
मन हतबल होऊन ऋतूतून ओघळत होतं
तसा आधार शांततेचा होता तरीसुद्धा
एक बावरेपण होतं
भावना भिजत होत्या
गंध मोहरत होता
आणि ते सुखाचे केशरी बिंब
स्थिरावत होतं त्या जाणीवेच्या उगमाजवळ
आणि
मोकळ्या आकाशात एक मन होतं
मनात मनभर होतं आणि
क्षणात मात्र क्षणभरच होतं
केशरी बिंबाजववळ…….
2021-01-29