रात्र उंबऱ्याशी उभी
कुणी विझवा रे दिवा
माझ्या घराच्या तळाशी
संथ निजला काजवा
रात्र देवळात उभी
कुणी वाजवा रे वीणा
गाभाऱ्याला चिरा देवूनी
देव पायरीत उभा
रात्र संगमावरी उभी
सरणावर ठेवून काया
आग तृश्नावली आता
निघावे, मरणधूळ पाया
मला न्यावे तू तळाशी
माझ्या हाती नाही दिवा
काजव्याच्या सोबतीला मी
एक निशाचर पावा…
*
वाचा
दिनेश निर्मल यांच्या कविता
कविता
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
डॉ. दिनेश निर्मल हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्क्रीनप्ले रायटर म्हणून कार्यरत आहेत.