कोणी हळूच उठून गेले मैफलीतून
अजून गातो चंद्र ती जीवघेणी धून
तुलाच झाले का ओझे माझ्या प्रेमाचे
एकटाच तो पक्षी वेचतो अश्रू झाडांचे
येशील तु घेऊनी कधी स्वप्न तुझे इथे
मी घालीन नक्षी श्वासांची माझ्या तिथे
सारेच आले संपाया विझले दिवे
विसावले खिडकीशी व्याकूळ स्वप्नांचे थवे
*
वाचा
डॉ. प्रिया दंडगे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कवयित्री प्रिया दंडगे या डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायाबरोबरच वृत्तपत्रं, नियतकालिकांमधून नियमितपणे लेखन करतात. विविध कथा स्पर्धांमधून त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत. त्याचबरोबर 'स्वयंसिद्धा' या संस्थेच्या वतीनं त्या आरोग्य शिक्षणाचं कामसुद्धा करतात.
वा, खूप सुंदर कविता आहे , खूप छान !!