अशा स्निग्ध दुपारी..

priya-dandage-kolhapur-vacha-marathi-kavita-online-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

अशा स्निग्ध दुपारी
निजले पक्षी गवतात
व्याकूळ तळ्याकाठी कुणी
हातात घेतला हात

ऊन झाडावरूनी
सरकत सरकत जाई
तू करू नकोस आज
घरी जाण्याची घाई

सावल्यांना पकडून
पाणी बदलते कूस
शुभ्र नभांची दृष्ट
लागेल तुझ्या रुपास

त्याच्या देहाचा गंध
उन्हासारखा चमकतो
श्वासात मिसळूनी
पुन्हा, मनात रेंगाळतो..

*

वाचा
डॉ. प्रिया दांडगे यांच्या कविता
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Doctor | + posts

कवयित्री प्रिया दंडगे या डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसायाबरोबरच वृत्तपत्रं, नियतकालिकांमधून नियमितपणे लेखन करतात. विविध कथा स्पर्धांमधून त्यांना पारितोषिकं ‌मिळाली आहेत. त्याचबरोबर 'स्वयंसिद्धा' या संस्थेच्या वतीनं त्या आरोग्य शिक्षणाचं कामसुद्धा करतात.

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    खूपच सुंदर कविता

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :