नगरातून निघून जाताना तुला दीपस्तंभाने पहिले होते,
काही अंधुक-अस्पष्ट पावले देवळाकडे जात होती .
देवळाला घंटा नव्हती ,
दगडे, काही कोमेजलेली फुले. ती तूच वाहिली असणार…
गाभाऱ्यात पैंजणांची घुंघरे सापडली. तुझीच असतील.
पैंजणाचा नाद होऊ नये म्हणून सोडून गेली असशील.
त्यात अजूनही नाद सुरूच आहे…
काहीतरी क्षितिजावर हलताना दिसले.
दुपट्टा कळसावर फडकत अडकला तुझाच असणार…
काही पावले पुन्हा मागे जाता-जाता
पर्वताच्या टोकावरील दगडावर एकच पाऊल उमटून गेले आहे .
आता वळीवाचा पाऊस दाटून आला आहे.
सारी त्या दगडावरील पावलावर कोसळू लागल्या…
पुराने मला वाहून नेले…
आता मी पुन्हा नगरात उभा तुझ्यविना…
*
वाचा
दिनेश निर्मल यांच्या कविता
कविता
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
डॉ. दिनेश निर्मल हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्क्रीनप्ले रायटर म्हणून कार्यरत आहेत.