तुझ्या कोवळ्या वयात
तुझ्यावर झालेल्या अत्याचारांचं
दावं बांधलंस तुझ्या
कोवळ्या मुलांच्या गळ्यात…
तुमच्या बापानं उध्वस्त केलं
लग्न करुन माझं आयुष्य,
कोवळ्या निरागस बालीश वयात
हे बिबंवत गेलीस वारंवार…
त्यांचं बागडणं, हसणं, रुसणं
कलाकलानं मोठं होणं
यांचा आनंद कधी घेतलाच नाहीस..
मुलांच्या विश्वात रमली नाहीस..
तुझं विस्कटलेलं जीवन तुझ्या
साठीतही शोधत राहिलीस..
वेळीच तुझी तुच फुंकर
घातली असतीस तुझ्या वेदनांना
तर आज तुझ्या मुलांची
त्यांच्या तरुण वयात उध्वस्त
झाली नसती त्यांची आयुष्य,
खुंटली नसती त्यांची वाढ…
उलटी टांगली गेली नसती
त्यांना वटवाघुळासारखी…
आता तु नाहीस आणि
तुझ्यावर अत्याचार करणाराही नाही,
पण तुझा आनंद शोधतांना
तु त्यांचा आनंद हिरावून घेतलास
मुळं धरायच्या आतच मनं
उखडली गेली कायमचीच…
*
वाचा
कविता
कल्पना बांदेकर यांच्या कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी