… आणि मला सूर्य दिसला

sudesh-ingale-marathi-kavita-ani-surya-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-k-fraser-unsplash

प्योत्र झलोमोवच्या सांद्र बुबळांत
निलोवनांच्या करुण हृदयात;
घाम म्हणवणाऱ्या
थेंबांच्या माणिकांत
आणि रक्ताचा रंग दिसणाऱ्या निरंजनांत
… मला सूर्य दिसला

२३ मार्चच्या असीम त्यागात
तारुण्याच्या लोभस होमात;
बर्फावरच्या राकट राशीत
जोपासलेल्या तीव्र ज्वाळांत
आणि फासावरती अनुभवलेल्या
पूर्णत्वाच्या धुंद क्षणांत
… मला सूर्य दिसला

मानवतेच्या शांत लढ्यात
कर्तव्याच्या गाढ कवेत;
निरागस हसणाऱ्या
चष्म्याखालच्या नजरांत
आणि सूर्याची शकले शोधणाऱ्या माझ्या मनात
… मला सूर्य दिसला

*

वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता

कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
बायजा
– कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :