वयाच्या पंचविशीत ‘कोसला’ आणि २०१० साली ‘हिंदु’ या बहुचर्चित कादंबर्या तसेच कविता, भाषाभ्यास, संतसाहित्य इ. साहित्य लिहून साहित्यवाड्मयात मोलाची भर घालणारे सुप्रसिध्द लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे.
एक माणूस, लेखक, अभ्यासक सगळ्या भूमिकांशी निष्ठावंत राहून कार्य करण्याचा त्यांचा स्वभाव. अशा या लेखकाच्या वाड्मयीन, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा मागोवा घेवून त्याची निर्मितीशीलता, जीवनद्ृष्टी आणि कार्य यांचा साकल्याने परिचय या ग्रंथात केलेला आहे. नेमाडे यांचा सर्वांगीण परामर्श या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
*
भालचंद्र नेमाडे : व्यक्ती, विचार आणि साहित्य
संपा.: विलास खोले
किंमत : 700/-₹
वाचा
पुस्तक परिचय
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!