कविता दातीर

लहानपणापासून वाटायचं, आपल्याला जगभरातल्या सगळ्या भाषा याव्यात. त्यातूनच नवनवे शब्द शिकणं, शब्दांच्या मुळाशी जाणं, अगदी परदेशी भाषांमधली गाणी ती भाषा कळत नसताना ऐकणं असं सुरू झालं.
ठरवून आर्ट्स घेतलं. एमए केलं. लिहायला-वाचायला लागले. आणि या सगळ्यातून ‘गोष्ट’ नावाच्या अद्भुत कलेशी ओळख झाली.
‘बाई’ म्हणून जगणं सुरूच होतं. साहित्यातसुद्धा बाई पात्रं, बाईपण शोधू लागले. या सगळ्यांनी पुढं ‘कविताच्या कविता’ या कविता संग्रहाचं रूप घेतलं. 
एमएनंतर मास कम्युनिकेशन करत असताना तर मला खजिनाच सापडला, चित्रभाषेचा! गोष्टी सांगण्याचं वेड होतंच, आता गोष्टी चित्रभाषेतून सांगण्याचा प्रवास सुरू झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘यूटीव्ही’चं ‘डान्स इंडिया डान्स’, ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या काही सीरिअल्सबरोबरच ‘देऊळ’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासाठी ‘असिस्टंट डिरेक्टर’ म्हणून काम केलं. व्यावसायिक अनुभव मिळवला. 
हे सगळं करत असतानाच ‘बबई’ ही शॉर्ट फिल्म बनवली. ती भारतातल्या अमराठी राज्यांमध्ये, जगभरामध्ये प्रदर्शित झाली. आपल्याला जे सांगायचं आहे, मांडायचं आहे ते भाषा-संस्कृती यांचे सारे अडसर पार करून लोकांपर्यंत नेमकेपणानं पोचतंय, हे पाहून नवं बळ मिळालं.
सोबतच, ‘अक्षर मानव’सारख्या संस्थेशी जोडले गेले. काही काळ ‘राज्य अध्यक्ष’ म्हणूनही कार्यभार सांभाळला. या निमित्तानं महाराष्ट्रभर भटकंती झाली. अनेक नव्या गोष्टींशी जोडून घेता आलं.
या सगळ्या प्रवासातूनच मला मन रमण्याचं ठिकाण सापडलं. ते आहे गोष्ट – गोष्टी ऐकणं, वाचणं, सांगणं…! आणि त्यातूनच उभं राहिलं ‘गोष्ट क्रिएशन्स’.
सध्या त्याचाच कार्यभार सांभाळतेय. भेटत राहू. गोष्टी ऐकण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी. कधीही.

संपर्क :
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :