संवाद बापलेकींचा
संपादन : नंदिनी म्हाडेश्वर
पाने : 247
किंमत : 250 रु.
सवलत मूल्य : 200 रु
मानवी जीवनात आई वडील व मुलांचं नात अत्यंत सखोल, भावनाशील तसंच समृद्ध असत. पालकत्व म्हणजे मुलांना वाढवताना येणारे बारे- वाईट अनुभव, तसेच अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगानी भरलेली एक प्रकारची पोतडीच. ह्यामध्ये आईइतकाच सहभाग, सहकार्य वडीलांचं असत. पण वडिलांविषयी असलेल प्रेम व्यक्त केल जात नाही. समाजाचं प्रतिबिंब साहित्यात पडत असल्यामुळे साहजिकच साहित्यातूनही ते अव्यक्तच राहतं. एकूणच भारतीय व मराठी साहित्यात आईविषयी जितकं विपुल लिहिलं गेल आहे, जात आहे. त्या तुलनेत वडिलांविषयीच्या भावना नजरेस आणून देणार साहित्य बेताचच. नाटक, चित्रपटांतुनही याबद्दलचं चित्रण फारसं आढळत नाही अस का व्हावं ?
अनुभवांची देवाणघेवाण करणारे, पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, मार्गदर्शन करणारे वडील मित्रासारखे वाटतात. म्हणजे वडीलही मुलांच्या घडणीत अव्यक्तरित्या काही भूमिका बजावित असतात. पण वडिलांचे हे ऋण फारसे जाहीर का केले जात नाही ? आजही काही भावनिक व सामाजिक अडसर आहेत का, जे आपल्या जन्मदात्याविषयी मोकळेपणाने लिहू देत नाहीत ? अशा विचारांतून हा विषय मनात रुतत गेला. त्यादृष्टीने प्रयत्न करायचा ठरलं.
त्याअनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलींना या विषयावर लिहीतं करायचं ठरलं. काहींनी सुचवलं की वडिलांनीही मुलिंबद्दल लिहिल्यास पुस्तकाला जास्त उठाव येईल अशा तर्हेचने पुस्तकाच स्वरूप साकारले. राजकारण, समाजकारण, प्रशासन, साहित्य न्यायालय, दिग्दर्शन, संशोधन अशा क्षेत्रातील मान्यवर व त्यांच्या मुली अशा जोड्या निवडल्या गेल्या. नात्यातील गमतीजमती, स्वभाव गुणदोष, अपेक्षा , काम अपेक्षाभंग, सर्वच बाबतीत विषयाला मोकळीक दिली असली असल्याने आणि त्याच सोबत लेखनशैली वेगवेगळी वापरायची मुभा यामुळे संवाद बापलेकीं चा खुलून गेला आहे. सदैव स्मरणात राहील असा हा संवाद बापलेकींचा.
(घरपोच पुस्तकांसाठी संपर्क सहित वितरण 9960 374739 / 90963 99397 Email: [email protected] )
Whatsapp द्वारे संपर्क करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. https://wa.me/919960374739
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!