पाय,
पायात नाही काय!
या पाय आर च्या पायात माझं एक वर्ष वाया गेलय
पाय समजले त्यांचे पाय धरून मी पाणी प्यायलेय
पाय हळदुले,
पाय आळतुले,
पाय लाथाळू
पाय जळवाळू
पाय दळदार
पाय कमळ कळी
पाय सिंहासनावर ठेवणारे ,
पाय गादीवर ठेवणारे ,
पाय कोठीवर जाणारे,
पाय काठीवर नाचणारे,
पाय बळीच्या डोक्यावर ठेवलेले,
पाय लक्ष्मणाने पूजलेले,
पाय पायात पाय घातलेले ,
पाय मागे लाऊन पळणारे,
पाय चिंटुले रेशमी
पाय पाय पाय करणारे
पाय अन्नासाठी दाहीदिशा वणवणणारे ,
शेणात बरबटणारे,
चिखलात रुतणारे
मात्र पाय आपल्या पायावर उभारण्यासाठी हे विसरल्यावर
पाय चाटण्यासाठी ,
पाय धरण्यासाठी,
पायावर घालून घेण्यासाठी ,
लोटांगणासाठी
आणि ठोकरण्यासाठीही
2020-12-02